Thergaon : कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी केसदान उपक्रम

एमपीसी न्यूज – कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी ( Thergaon) थेरगाव येथील राहुल सरवदे हे केसदान हा उपक्रम राबवित आहेत. मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट या संस्थेकडून दान मिळालेल्या केसांचे विग बनवले जातात. हे विग कर्करोगामुळे केस गेलेल्या रुग्णांना दिले जातात.

राहुल सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत कार्यरत आहेत. तसेच ते परिवर्तन सोशल फाऊंडेशन आणि थेरगाव सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रीय असतात. त्यांनी पहिल्यांदा 27 जुलै 2019 रोजी केसदान केले. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2022 आणि आता पुन्हा एकदा केसदान केले आहे.

Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी मार्शल लीलाकर ससून रुग्णालयातून पळाला

टाटा हॉस्पिटल मुंबई संलग्न मदत ट्रस्ट ही संस्था हे दन केलेले केस जमा करते. त्यापासून विग बनवले जातात. कर्करोगाशी उपचार पद्धती असलेल्या केमोथेरपीमध्ये रुग्णाच्या डोक्यावरील सर्व केस गळून जातात. त्यामुळे अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी मदत ट्रस्टने केलेले विग त्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिले जातात.

केसदान या उपक्रमाबाबत बोलताना राहुल सरवदे म्हणतात, “केसदान आणि इतर सामाजिक कार्य करत असताना मला माझे कुटुंबीय व सहकारी मित्र परिवार यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. आजवर मी 45 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले असून तीन वेळा केसदान ( Thergaon) केले आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.