Thergaon Hospital : महापालिका रुग्णालयात ‘हर्निया’ची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रूग्णालयात (Thergaon Hospital) पॅराडिओडिनल हर्निया (पोटाच्या आतडीचा हर्निया) या आजारावरची दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेच्या पोटातील लहान आतड्याच्या गुंतागुंतीमुळे झालेल्या हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

याबाबतची माहिती शल्यचिकित्सक डॉ. कांचन वायकोळे यांनी दिली. त्या म्हणाल्या, ताथवडे येथे राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेला पोटात वेदना होत होत्या. त्यांच्या डाव्या बाजूला पोट फुगले होते. हा त्रास त्यांना मागील 5 वर्षांपासून होत होता. या महिलेने अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. परंतु, योग्य निदान झाले नाही. त्यानंतर या महिलेने महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातील शल्य चकित्ससा (सर्जरी) विभागात उपचार सुरू केले.

Talegaon Dabhade News : सांस्कृतिक कार्यामुळे मिळालेली जनतेच्या हृदयातील जागा चिरंतन – भाऊसाहेब भोईर

ही महिला 11 मे ला रूग्णालयात दाखल झाली. सी. टी. स्कॅन करण्यात आल्यावर पॅराडिओडिनल हर्नियाने असल्याचे निदान झाले. त्यानंतर 17 मे रोजी या महिलेवर शास्त्रक्रिया करण्यात आली. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर तिच्या पोटातील लहान आतडीची गुंतागुंत (पॅराडिओोडिनल हर्निया) सोडवण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पॅराडिओडिनल हर्निया हा आजार अत्यंत दुर्मिळ असल्याने निदान करणे कठीण असते. वेळेत निदान होणे आवश्यक आहे. तसेच, वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही; तर मृत्यू देखील होण्याची शक्यता असते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकिय विभाग (Thergaon Hospital) प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. कांचन वायकोळे यांच्यासह डॉ. ज्ञानेश पाटील , डॉ. रोशन किन्होळकर, डॉ. प्रतीक्षा कोलते, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पवार, डॉ. नेहा पाटील , डॉ. शाफिया शेख, परिचारिका सरला चव्हाण , प्रणाली गायकवाड, जयवंत गायकवाड यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.