Thergaon : एम. एम. पॉलीटेक्निकमध्ये “अवंत २०१९” राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या इतर अंगभूत कलागुणांना वाव दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हा ध्यास घेऊन एम. एम. पॉलीटेक्निकमध्ये “अवंत २०१९” या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून यशस्वी सांगता केल्याची माहिती प्राचार्या गीता दिली.

थेरगाव, पिंपरी -चिंचवड येथील मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक नेहमीच विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना वेगवेगळी व्यासपीठ मिळवून देत असते. त्याचाच एक भाग म्हणून “अवंत २०१९” हि राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली असून यामध्ये जवळपास चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

  • या स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून ह्यामध्ये कार रेसिंग, ब्लाइंडकोडींग, लेथ वॉर, ऑटो स्केचिंग, ब्रिज मेकिंग, प्रश्नमंजुषा यासारख्या अकरा स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. ह्या स्पर्धेत विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा तीन दिवस चालली असून विजेत्यांना जवळपास पन्नास हजारापर्यंत बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आली होती.

डिप्लोमा अभियंत्यांना शिक्षणासोबत कल्पकतेची जोड आवश्यक असून अशा स्पर्धाचे आयोजन जास्तीत जास्त केल्यास समाजाला दर्जेदार अभियंते मिळतील, असा विश्वास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.बी.जी.जाधव व्यक्त करून स्पर्धेचे आयोजक प्रा.सतीश भालेराव आणि त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.