Thergaon News : महात्मा ज्योतिबा फुले हे पुरोगामी विचारांचे महान क्रांतिकारक – प्रकाश जाधव

एमपीसी न्यूज : थेरगाव येथील जिजाऊ सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले की, (Thergaon News) महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील महान पुरोगामी विचाराचे क्रांती कारक होते. समानतेचे महान पुरस्कर्ते त्या काळातले प्रसिद्ध उद्योजक महिलांसाठी शाळा सुरू करणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे, ज्योतिराव फुले हे क्रांती सूर्य होते. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात जाधव बोलताना म्हणाले की, समाज सुधारण्यासाठी पूर्ण वेळ वाहून घेतलेले सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले हे आदर्श दाम्पत्य होते. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले विचार मंचचे रविंद्र चव्हाण व विलास माने यांनी केले होते.

Wakad News : गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदाराला अटक

या वेळी संभाजी ब्रिगेड चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Thergaon News) सूत्रसंचालन विलास माने यांनी केले.आभार किरण खोत यांनी मानले यावेळी सुरज पाटील महेश जगताप सुधिर पवार नितीन गायकवाड रमेश तुपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.