Thergaon News : थेरगाव येथे पाण्याच्या बकेटमध्ये पडून एक वर्षाच्या चिमुरड्याचा अंत

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आई वडिलांची गाढ झोप चिमुकल्याचा जिवावर (Thergaon News) बेतली असून पाण्याच्या बकेटमध्ये पडून एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.2) दुपारी थेरगाव येथील समता कॉलनी येथे घडला आहे.

मोहम्मद फैसल तारीक खान असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समतानगर कॉलनी येथे भाडेतत्त्वारील एका खोलीत हरीश खान (वय 29) आणि जोहराजबी खान (वय 25) हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह राहतात. हे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेश येथील आहे. खान यांचे काचेचे दुकान आहे. तारीख आणि त्यांच्या पत्नी जोहराजबी दोन्ही मुलांसह गुरुवारी दुपारी घरात झोपले होते.

Kasarwadi News : बँक खात्याची केवायसी चा बहाणा करत खाते केले रिकामे

 

त्यावेळी एक वर्षाचा फैसल हा झोपेतून उठून रांगत मोरीमध्ये गेला. तेथे प्लास्टिकच्या 20 लिटरच्या बादलीमध्ये पाणी होते. पाणी खेळत असताना फैसल बादलीत पडला. काही वेळाने जोहराजबी उठल्या असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी फैसलला तात्काळ उपचारासाठी थेरगाव मधील रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान फैसलचा मृत्यू झाला.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पालकांचे क्षणभराचे दुर्लक्ष हे त्यांच्या चिमुरड्याच्या जिवावर बेतु शकते त्यामुळे डोळ्यात तेल घालून आपल्या पाल्याचा सांभळ करा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.