Thergaon News: प्रबोधनातून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभाग आणि आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनातून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात आज (गुरुवारी) जनजागृती करण्यात आली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, बिर्ला हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे, रुग्णालयाचे सल्लागार डॉ. राजशेखर अय्यर, रमेश दीक्षित, डॉ. आशुतोष श्रीवास्तव, राजेश दुबे, चंद्रकांत भोसले अभिषेक राजपूत, रमेश यादव, अमोल शिवणेकर, सपना महाजन, मुख्याध्यापक नटराज जगताप, आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, विजया जाधव, अरुण राऊत, प्रशांत पवार, अभय दारोळे, राजू जगताप, अनिल डोगरे, सूर्यकांत चाबुकस्वार, सुषमा गायकवाड, कविता राजगुरू उपस्थित होते.

यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना या साथीच्या आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी याचे प्रबोधन व जनजागृती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.