Thergaon News : नगरसेविका ममता गायकवाड यांचा ‘जिजाऊ सावित्री भूषण’ पुरस्काराने गौरव

0

एमपीसी न्यूज – मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ममता गायकवाड यांना यंदाचा ‘जिजाऊ सावित्री समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

थेरगाव येथील जिजाऊ सभागृहात मंगळवारी (दि.12) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, नगरसेविका जनाबाई जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर, राजश्री शिरवळकर, मोनिका भोसले, चैताली भोईर आदि उपस्थित होते.

यावेळी ममता गायकवाड म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्यामुळे मला विशेष आनंद होत आहे. माझी जबाबदारी सुद्धा वाढली आहे. पुरस्काराचा सन्मान ठेवून यापुढेदेखील समाजासाठी कार्यरत राहीन.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी राजमाता जिजाऊ यांचे स्वराज्य उभारण्यातील योगदान, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.

मराठा सेवा संघ, उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाईं फुले व स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि शिकवण लोकांसमोर मांडली.

याप्रसंगी उपस्थित सर्वांना राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

सुत्रसंचालन परमेश्वर जाधव यांनी केले. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतिश काळे यांनी आभार मानले.

ज्ञानेश्वर लोभे, विनोद घोडके, निकील गनुचे, निरंजन माने, समिक्षा बादाडे, फातिमा अन्सारी, दीपक मोहिते यांनी क्रार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.