Thergaon News : थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन

0

एमपीसी न्यूज – थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी फराळासोबत ज्येष्ठ नागरिक, राजकीय मान्यवर, पोलीस कर्मचारी, डॅाक्टर, पालिका कर्मचारी, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या भेटीसाठी व गप्पांची मैफिल रंगली.

मागील सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे भेटीगाठी आणि एकमेकांच्या घरी जाणे लोक टाळत होते. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित या फराळाच्या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड परीसरातील सामान्य नागरीक उत्सुकतेने सहभागी झाले होते.

या कार्यक्रामाचे आयोजन थेरगाव सोशल फाऊंडेशनचे कोर मेंबर अनिकेत प्रभु, निलेश पिंगळे, राहुल सरवदे, अनिल घोडेकर व इतर सभासदांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III