Thergaon News : केजुदेवी बंधाऱ्याजवळ नदीच्या काठावरील कमळाची फुले वेधत आहेत नागरिकांचे लक्ष

 एमपीसी न्यूज – केजुदेवी बंधाऱ्याजळील प‌वना नदीच्या काठाने कमळाची फुले बहरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पांढऱ्या रंगाची ही मनमोहक कमळाची फुले मन प्रसन्न करीत आहेत.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पवना नदीच्या पाण्याचा प्रवाह उत्तमरित्या सुरू आहे, हवेत गारवा वाढला आहे. अशात केजुदेवी बंधारा येथे प‌वना नदीच्या काठावर कमळ ही वनस्पती पाण्यावर दिसायला लागली आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या छटा असलेली असंख्य कमळाची फुले उमलली असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

( छायाचित्रे – अरुण गायकवाड)

कमळाच्या झाडाला ‘वॅाटरलिली’ असेही म्हणतात. हे झाड ‘निम्फिएसी’ कुळातील असून या प्रजातीचे नाव ‘निम्फिया लोटस’ असे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.