Thergaon News : फ्लॅटचा ताबा वेळेत न देणाऱ्या कॅन्स्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पैसे घेऊन देखील फ्लॅटचा ताबा वेळेत न देता व बिल्डींगचे बांधकाम अर्थवट ठवणाऱ्या आणि पैसे परत मागितले असता पैसे परत देण्यास नकार देणाऱ्या साई कॅन्स्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फ्लॅट विकत घेतलेल्या दोन व्यक्तींनी वाकड पोलीस ठाण्यात कंपनी भागीदारांविरोधात फिर्याद दिली आहे.

विशाल संपत खुडे (वय 38, रा. विरंगुळा हौसिंग सोसायटी, वेणुनागर, वाकड) व संदिप काशिनाथ कर्डीले (वय 37, रा. महादेव कॉलनी, थेरगाव) या फ्लॅट धारकांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी साई कॅन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार शैलेश चांगदेव लांडे ( वय 31, कासारवाडी), पंकज नामदेव रानवडे (वय 30, कासारवाडी) व प्रदीप के भोसले ( वय 37, कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील लक्ष्मीबाई उद्यानाजवळ साई कॅन्स्ट्रक्शन यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे.

या इमारतीत फिर्यादी विशाल संपत खुडे यांनी फ्लॅट नंबर 101 बुक करून त्यासाठी 28 लाख 800रुपये दिले होते. तसेच फिर्यादी संदीप काशिनाथ कर्डीले यांनी फ्लॅट नंबर 301 बुक करून त्यासाठी 30 लाख रुपये दिले होते.

फिर्यादी यांनी कंपनीकडे फ्लॅटचा ताबा मागितला असता त्यांनी तो देण्यास टाळाटाळ केली. इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे फिर्यादी यांनी मालकाकडे पैसे परत करण्याची मागणी केली.

मात्र, पैसे देण्यास मालकांनी नकार दिला. त्यामुळे फ्लॅट ताबा वेळेत न देता व बुकिंगचे पैसे परत न केल्यामुळे साई कॅन्स्ट्रक्शन कंपनीच्या भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.