Thergaon News : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रायफल, पिस्तुल नेमबाजी केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव (Thergaon News) येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रायफल, पिस्तुल नेमबाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. महापालिकेचे मावळते आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. 

माध्यमिक विद्यालय थेरगावच्या शाळेमध्ये सुरू असलेल्या क्रीडा वातावरणाचे आयुक्तांनी कौतुक केले. केंद्रातून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या कोचेसचे ही अभिनंदन करून महापालिकेतील शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करून आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचे, शाळेचे नाव उज्वल करण्यास सुचित केले.

RSS : संघाची बदनामी करण्याच्या हेतूने समाज माध्यमांतून मजकूर पसरविला जातोय

उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, माध्यमिक विद्यालय (Thergaon News) थेरगावचे मुख्याध्यापक सी.टी. कदम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, राष्ट्रीय कोच /प्रशिक्षक विजय रणझुंजारे, राष्ट्रीय पिस्तुल खेळाडू गीतांजली रणझुंजारे, राष्ट्रीय राज्य कबड्डी खेळणारे खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक बन्सी आटवे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.एस. पवार, प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष लावड सर, टकले सर तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार रामेश्वर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.