Thergaon News : ‘शिवसेना टी शर्ट’चे खासदार बारणे यांच्या हस्ते अनावरण

एमपीसीन्यूज : शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या वतीने शिवसैनिकांसाठी  तयार करण्यात आलेल्या शिवसेना टी शर्टचे अनावरण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज, गुरुवारी करण्यात आले.

खासदार बारणे यांच्या थेरगाव येथील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मावळ तालुक्यातील शिवसैनिकांसाठी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी शिवसेनेचा लोगो असलेले टी शर्ट तयार करुन घेतले आहे. लवकरच ते तालुक्यातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उप जिल्हाप्रमुख भरत ठाकुर, उप तालुका प्रमुख मदन शेडगे, तालुका संघटक यशवंत तुर्डे, युवासेना मावळ अध्यक्ष अनिकेत घुले, भारतीय कामगार सेना लोनावळा शहराध्यक्ष नितीन खांडभोर, विद्यार्थी संघटनेचे बाळा हुलावळे, शिवसेना देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, जेष्ठ शिवसैनिक देवा कांबळे, शिवसैनिक विशाल दांगट पाटील, वडेश्वर ग्रा .प सदस्य शंकर हेमाडे, जेष्ठ नेते माउली काकडे, शाखा प्रमूख राजु लष्करी, दिलीप खांडभोर, अशोक खांडभोर, दीपक खांडभोर, योगेश खांडभोर, जेष्ठ शिवसैनिक बबन भुरुक, विलास खांडभोर, आर्यन खांडभोर, राजेंद्र काकडे, सुनील चिमटे, आदिवासी संघटना अध्यक्ष विक्रम हेमाडे, प्रवीण मोरमारे, मनोज लष्करी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.