Thergaon News : थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

एमपीसी न्यूज- नुकतेच थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार (Thergaon News) पडले. तब्बल 23 वर्षांनी एकत्र आलेल्या 78 बालमित्रांनी व 16 शिक्षकांनी पुन्हा तीच शाळा, त्याच गंमती जंमती अनुभवल्या.

23 वर्षापूर्वी सन 1998-99 साली माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे शिकलेले विद्यार्थी सामाजिक माध्यमातून एकत्र आले. पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत, ज्यांनी आपल्याला घडवले, त्या शिक्षकांना भेटून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देशाने या स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Ujni Irrigation News : उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटला

यावेळी गुरुपूजन व पदपूजा करण्यात आले. फुलांचा वर्षाव करत आदरणीय गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.

या संमेलनाला माजी शिक्षक काझी रईसा ,  सुनंदा रत्नपारखी, कोंढवळे राजू, सुरेश बुधकर, जहुर मुल्ला, अकबर मुल्ला, जयराम वायळ, बी पी भोसले,  वंदना कुलकर्णी, रेशमा नायकवडी, अर्जुन गरदडे, उल्हास कदम, सुभाषचंद्र प्रामाणिक, लक्ष्मण कोळेकर आदी उपस्थित होते.

मनोज रेड्डी, अफ्रीन शेख मोकाशी,  अमित रणदिवे,  सचिन लोखंडे, विनोद पवार, विनोद मिरगणे, शिवाजी बांदल,  रशीद शेख, आरती भूतकर, सीमा काकडे विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनाचे आयोजन (Thergaon News) केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.