Thergaon News : कोपर्डीच्या निर्भयास मराठा क्रांती मोर्चाकडून श्रद्धांजली

एमपीसीन्यूज : मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने कोपर्डीच्या निर्भयास मंगळवार (दि. 13) थेरगाव येथील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रकाश जाधव, धनाजी येळकर पाटील, प्रकाश पठारे, हमीद शेख, रुपाली राक्षे, पुजा भंडारे, मनाली खापेकर, नमिता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकाश जाधव म्हणाले, 13 जुलै 2016 रोजी कोपर्डी येथील मराठा भगिनीवर अनन्वित अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजात असलेला आक्रोश बाहेर पडला. सदर प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्यात आले.

न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली. परंतु, नराधम आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. यामध्ये सरकार चालढकल करत आहे. घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असताना आरोपींना फाशीचीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

धनाजी येळकर पाटील म्हणाले, शासनाने सदर आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची त्वरीत अंमलबजावणी केली नाही तर शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
आणखी किती दिवस मेनबत्त्याच पेटवायच्या, असा संतप्त सवाल विचारला.

सूत्रसंचालन गणेश सरकटे यांनी केले. आभार कृष्णा मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सतिश काळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.