Thergaon News : थेरगाव परिसरातील समस्या सोडविण्यासाठी महापौरांना साकडे

थेरगाव परिसरातील रस्ते आणि चेंबरची दुरवस्था

एमपीसी न्यूज: केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश केला गेला, पण थेरगाव परिसरातील चेंबर्स, रस्ते यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्या तातडीने सोडविण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी भिलारे यांनी केली आहे.

याबाबत भिलारे यांनी महापौर माई ढोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यामध्ये थेरगाव  मधील समस्यांकडे त्यांनी महापौरांचे लक्ष वेधले.

_MPC_DIR_MPU_II

शिवदर्शन कॉलनी, गणेश कॉलनी, आदर्श कॉलनी, स्वप्न पुष्प कॉलनी या भागातील चेंबर्स, रस्ते यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. उघडे चेंबर्स, त्यातून बाहेर येणारे सांडपाणी यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मोठे, गंभीर अपघातदेखील झाले आहेत.

रस्त्यांचे डांबरीकरण आणि चेंबर लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी भिलारे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.