Thergaon News : थेरगाव सोशल फाउंडेशन आणि एसई 2 डिजिटल सर्व्हीस एलएलपी यांच्याकडून पूरग्रस्त मजरे-काशी गावाला 120 लोखंडी पलंगाची मदत

एमपीसी न्यूज – मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरात पूराचे पाणी शिरले. अनेक दिवस हे शहर पूराच्या पाण्याखाली होते. यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चिपळूणमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने सलग तिस-यांदा चिपळूणमध्ये मदत पाठवली आहे.

थेरगाव सोशल फाउंडेशन आणि एसई 2 डिजिटल सर्व्हीस एलएलपी यांच्याकडून पूरग्रस्त चिपळूणमधील मजरे-काशी गावाला 120 लोखंडी पलंग मदत म्हणून देण्यात आले आहेत. पूराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक नागरिकांची झोपण्याची गैरसोय होत आहे. ही गरज लक्षात घेऊन 120 लोखंडी पलंग पूरग्रस्त नागरिकांना देण्यात आले. रविवारी (दि.29) मदतीचे वाटप करण्यात आले.

फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी देखील दोनवेळा चिपळूण पूरग्रस्तांना मदत दिली. पहिल्यांदा श्रमदान तर, दुस-यांदा गॅस शेगडी व अन्नधान्य किट व कपड्यांची मदत केली. पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे सातारा, रायगड, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्याचा सर्वाधिक फटका चिपळूण, पाटण आणि महाड याठिकाणी बसला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.