Thergaon: तरूणाला एक लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज – गुगल सर्चव्दारे मिळालेल्या नंबरवरून तरूणाने दोन संकेतस्थळांची लिंक ओपन केली. युपीआय पिन नंबर टाकल्यानंतर तरूणाच्या एचडीएफसी बॅकेच्या खात्यातून 1 लाख रूपये काढून फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला.

महेश दादासाहेब घुसळे (वय 38, रा. संतोषनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुसळे कामानिमित्त गुजरात येथील मोरबी येथे गेले होते. त्यांनी तेथे काही माहितीची गरज लागली. त्यामुळे त्यांनी ती गुगलवर सर्च केली. त्यावर 6229564667 आणि 7026451144 हे मोबाईल क्रमांक आले.

या क्रमांकावरून आलेल्या दोन लिंक घुसळे यांनी ओपन केल्या. युपीआय पिन नंबर टाकला असता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून 99 हजार 998 रूपये दुसर्‍या बॅक खात्यावर वळते करून फसवणूक केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.