Thergaon: हात उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे एकाचा मोडला पाय

One of them broke his leg because he asked for the loan

एमपीसी न्यूज –  हात उसने दिलेले पैसे मागितल्यामुळे चिडलेल्या तिघांनी एकाला लोखंडी टिपॉयने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला. ही घटना थेरगावातील बेलठिकानगर येथे शनिवारी  घडली. याप्रकरणी तिनही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश बबन गायकवाड, प्रिती दिनेश गायकवाड, अमोल बबन गायकवाड (सर्व रा. बेलठिकानगर, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मुकेश आनंद गायकवाड (वय 39, रा. आदर्शनगर, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश यांनी आरोपी प्रितीला हात उसने पैसे दिले होते. ते मागण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरी गेले होते.

पैसे मागण्यासाठी घरी आल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी लोखंडी टिपॉयने त्यांच्या दोन्ही पायांना मारहाण करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा पाय मोडला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

फौजदार चौगुले तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.