Thergaon: पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगावमधील बोट क्लबचे होणार नूतनीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकतर्फे थेरगाव येथील बोट क्लबचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 96 लाख रूपये खर्च होणार आहे.

महापालिकेचे थेरगाव येथे बोट क्लब आहे. पवना नदीकिनारी निसर्गरम्य वातावरणात असणा-या या बोट क्लबमध्ये दररोज शेकडो पर्यटक हजेरी लावतात. महापालिकेतर्फे या बोट क्लबचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 1 कोटी 24 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 1 कोटी 23 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या.

त्यानुसार तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी चैतन्य एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 22.75 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 95 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 1 लाख 7 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 33 हजार रूपये असे एकूण 96 लाख 60 हजार रूपये खर्च होणार आहे. दीड वर्षात बोट क्लबच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.