Prerna bank : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेचा नऊ टक्के लाभांश जाहीर

एमपीसी न्यूज : थेरगाव येथील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष कांतीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Prerna bank) कोविडचा प्रभाव असतानाही बँकेच्या एकूण व्यवसायात वाढ झाली. बँकेस रुपये 4.18 कोटींचा निव्वळ नफा झाला. बँकेतर्फे नऊ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

सभेला बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर, संचालक श्रीधर वाल्हेकर,  गबाजी  वाकडकर, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, संदीप पवार, राजाराम रंदील, मीना शेळके, सुजाता पारखी, उमेश आगम, राजेंद्र शिरसाठ, तज्ज्ञ संचालक नंदकुमार तोष्णीवाल, ॲड. अजितकुमार जाधव, चंद्रभागा भिसे,  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी सभासद व खातेदार मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

 

Child marriage : बालविवाह प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

ज्येष्ठ व्यक्ती ही राष्ट्राची अनमोल ठेव असून त्यांचे अनुभव कायमच प्रेरणा देणारे असतात, असे मत बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले. अध्यक्ष गुजर यांनी बँकेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा सांगितला. बँकेला यावर्षी ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला.(Prerna bank) मार्च 2022 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 404 कोटी रुपये व कर्जे 183 कोटी रुपये आहेत. कोविडचा प्रभाव असतानाही बँकेच्या एकूण व्यवसायात वाढ झाली. बँकेस रुपये 4.18 कोटीचा निव्वळ नफा झाला असून सी आर ए आर 22.48 टक्के राखण्यात बँकेस यश मिळाले आहे.

बँक सर्व सभासदांच्या सहकार्याने प्रगतीपथावर आहे‌. बँक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असून एटीएम, मोबाईल बँकिंग बँकेने सुरू केले आहे. (Prerna bank) यूपीआय अल्पावधीत सुरू होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. आगामी वर्ष हे बँकेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्या दृष्टीने बँक विविध संकल्प आणि योजना तयार करीत आहे.  बँकेच्या सभासदांनी बँकेवर दाखवलेला आजपर्यंतचा विश्वास बँक प्रगतीपथावर नेण्यास पोषक ठरला, असे मत अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले.

या सभेत 152 सभासदांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने व  वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सवी मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.(Prerna bank) सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे यांनी केले‌. ज्येष्ठ संचालक श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष मुंगसे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.