Thergaon: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण; विद्यार्थ्यांना दिली बचावाची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने आज (मंगळवारी) बचावाची प्रात्यक्षिके सादर केली. आग लागल्यावर इमारतीतून सुरक्षित कसे बाहेर पडायचे? याची विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली.

थेरगावातील माध्यमिक विद्यालय येथील शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय स्तरावर अग्निशमन व बचावाची प्रात्यक्षिके अग्निशामक विभागाच्या दलाने सादर करण्यात आली. प्रात्यकक्षिक सादरीकरणाच्‍या कार्यक्रमात सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापनाचे ओमप्रकाश बहिवाल, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पी. एन. चौगुले, एस. जी. रनवरे, सब ऑफिसर अरविंद गुळींग, सौरभ गिरकर, ए. बी. परब, सुर्यकांत मठपती, फारमन मनोज मोरे, मिलिंद पाटील, भुषण येवले, भाईदास लांडगे, दिलीप गायकवाड वाहनचालक राजाराम लांडगे, अमोल रांजणे, शुभम काळे आदी उपस्थित होते.

इमारतीला आग लागल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेच्या इमारतीबाहेर कशा प्रकारे बाहेर काढले पाहिजे?. शिक्षक आणि इतर इमारतीमधील स्टाफ यांनी सुरक्षितपणे इमारतीबाहेर कसे पडावे?, याबाबतची माहिती व प्रात्यकक्षिके करुन दाखविण्यात आली. तसेच छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीचे शमन कसे करायचे? याचे प्रत्यकक्षिक आग विझविण्याचे नायट्रोजन सिलेंडरद्वारे शाळेतील अध्यापक व अध्यापिका यांचेकडून अग्निशामक विभागाच्या दलाने करुन घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.