Thergaon : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळवून देऊ – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मानधनावर काम करणारे आणि ठेकेदारांकडे काम करणा-या सर्व विभागातील कंत्राटी आणि कर्मचा-यांना समान काम,समान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आपण लवकरच कामगार मंत्री, मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी, कामगार आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन असे, आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्यावतीने शनिवारी (दि. 15 डिसेंबर) थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. याचे उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, ज्येष्ठ कामगार नेत्या मेधा थत्ते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, सल्लागार ॲड. वैशाली सरीन, आबा गोरे, मनोज माछरे, संजय कुटे, महाद्रंग वाघेरे, चारूशिला जोशी, हनुमंत लांडगे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, मुकुंद वाखारे, दत्ता ढगे, विशाल भूजबळ, दीपक गळीतकर, महादेव बोत्रे, नंदकुमार घुले, पांडुरंग म्हस्के, सुनील विटकर, सविता निगडे,  निलेश जगताप, उत्तम गंगावणे, बंटी ठोकळ, वैभव देवकर, विजय मुंडे, उमेश बांदल, सुधीर वायदंडे, रमेश चोरघे, राजश्री गायकवाड, यमुना खंडागळे, विजया रोडे, वैशाली वळे आदी हजारो कामगार उपस्थित होते.

मेधा थत्ते म्हणाल्या की, असंघटीत कामागरांनी एका छताखाली एकत्र यावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठेकेदारांना, कर्मचा-यांना देण्यासाठी किमान वेतन, ईएसआय, साधन, मानधनाचे पैसे देते. तरीही ठेकेदारांकडून कर्मचा-यांना पुरेसे वेतन दिले जात नाही. समान काम ,समान वेतन मिळण्यासाठी आपण एका संघटनेच्या छताखाली कामगारांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

झिंजूर्डे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय, विद्युत, सुरक्षा, शिक्षण मंडळ, क्रीडा, मुख्य कार्यालय आणि इतर रुग्णालये तसेच इतर सर्व विभागातील मानधन, कंत्राटी पद्धतीने काम करणारे सुमारे चार हजारांहून जास्त कर्मचारी आहेत. या कर्मचा-यांना कायम कामगारांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे. कायम कामगारांप्रमाणे गणवेश व इतर साधने मिळावीत, आठ तासांचे काम, साप्ताहिक सुट्टी,वैद्यकीय रजा, ओळखपत्र, ईएसआयची वैद्यकीय सेवा आदी सेवा सुविधा कायम कामगारांप्रमाणे मिळाव्यात, यासाठी महासंघ प्रयत्नशील राहिल.स्वागत मनोज माछरे यांनी केले. सुत्रंसचालन हनुमंत लांडगे यांनी केले. आभार चारूशिला जोशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.