Thergaon : साजू योहंन्ना यांचे निधन

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील साजू (अण्णा) योहंन्ना यांचे सोमवारी (दि. 17) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग असायचा.

साजू यांचा बुलेट दुचाकी दुरुस्तीमध्ये मोठा हातखंडा होता. या व्यवसायामुळे पंचक्रोशीमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. गुरुवारी (दि. 20) थेरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.