Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने केली पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने जनजीवन उध्वस्त झाले आहे. पूरग्रस्तांना महाराष्ट्रातीन मदतीचा ओघ सुरु आहे. थेरगाव सोशल फाऊंडेशनच्यावतीने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.

साधारण गावात वाड्या असतात वस्ती असतात अशा ठिकाणी अनेक मंडळे तालमी असतात. त्यांचा कार्यकर्त्यांना एकत्र घेतले कारण त्यांना घर ते घर माहिती असते की कोणाला खरच गरज आहे आणि कोणाला नाही. मग आम्ही १० लोकांच्या अनेक टिम बनवल्या त्यात टीएसएफचे १० सदस्य व वाळवा युवाशक्ती चे १० सदस्य व त्यांच्या एका टेम्पो मध्ये सामान असे खालील भागात पाठवला.

हाळबाग, कोटबाग, जैन मंदिर परिसर, मळा, लक्ष्मीनगर, थोरात वस्ती, भोई वस्ती अशा वाळवा गावातील विविध ठिकाणी स्वयंसेवक रवाना झाले व घर ते घर मदत टीएसएफ किट व चादर ब्लँकेट पोचली. सुरेश पाटील त्याठिकाणी राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केली. तसेच वाटपाचे नियोजन ही केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.