Thergaon : मंगलनगर-थेरगाव येथे बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करा

ह्युमन राईटस असोसिएशनची मागणी

एमपीसी न्यूज – मंगलनगर-थेरगाव येथील शाळेच्या रस्त्यावर बेकायदेशीर चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे या वाहनाच्या आडोशाला प्रेमीयुगुल चाळे करतात, अशा वाहनांवर प्रशासनाने त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिशएन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय निरिक्षक रामराव नवघन यांनी पोलीस उप आयुक्त यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, श्री कांतीलाल खिंवसरा इंग्लिश मिडियम स्कूल आणि पिंपरी-चिंचवड मनपा शाळा मंगलनगर वाकड रोडवर स्थानिक रहिवाशी सोडून दुस-या ठिकाणी रहिवाशी असणारे नागरिक या रस्त्यावर वाहने उभी करुन जातात. या पार्क केलेल्या वाहनाच्या आडोशाला प्रेमीयुगुल चाळे करतात. तसेच वाहनांच्या आडोशाला आणि वाहनांत दारु पित बसतात. त्यामुळे तेथील रहिवाशी नागरिकांना या घडणा-या प्रकारामुळे खूप त्रास होत आहे. तरी याठिकाणी संध्याकाळी दोन ते तीन वेळा पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचारी पाठवावेत. पार्क केलेल्या वाहनांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. याठिकाणी नो पार्किंग करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर, जिल्हा संघटक मुनीर शेख, ‘ग’ प्रभागाचे सचिव प्रसाद देवळालीकर, ‘ड’ प्रभागाचे अध्यक्ष जयवंत कुदळे, ‘ड’ प्रभागाचे उपाध्यक्ष वैभव कादवाने, सचिव भास्कर घोरपडे, काळेवाडी शाखेचे अध्यक्ष सोहनलाल राठोड हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.