Thergaon: केजुबाई उद्यानाची धोकादायक सुरक्षा भिंत महापालिकेने पाडली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेरगाव येथील पवना नदीकाठी असलेल्या केजुबाई उद्यानाची धोकादायक सुरक्षा भिंत पाडली आहे. भिंतीला तडे गेल्याने खबरदारी म्हणून भिंत पाडल्याचे महापालिका अधिका-यांनी सांगितले.

थेरगाव येथील पवना नदी काठी महापालिकेचे केजुबाई उद्यान आहे. या उद्यानात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. सकाळी, संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणींची मोठी गर्दी उद्यानात असते.

  • उद्यानातील भिंतीला तडे गेले होते. पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे भिंत पडण्याची भिती होती. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली आली आहे.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सीमा भिंत, सुरक्षा भिंत कोसळण्याच्या घटना घडू शकतात. केजुबाई उद्यानातील सुरक्षा भिंतीला तडे गेले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने भिंत पाडली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.