BNR-HDR-TOP-Mobile

Thergaon : प्लॅस्टिक वापरणा-या दुकानदारांकडून दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरांत महापालिकेकडून प्लॅस्टिक बाळगणा-या दुकानांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई थेरगाव ते आनंदपार्क वॉर्ड क्रमांक 24 येथील दुकानदारांकडून त्यांच्याकडून पंधरा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

महापालिकेचे विशेश पथक प्लॅस्टिक बंदीसाठी फिरत असून थेरगाव ते आनंद पार्क येथे 16 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दुकानदारांकडून 4.60 किलो ग्रॅम प्लॅस्टिक जप्त करुन एका दुकानदारांवर दुस-यांदा प्लॅस्टिक ग्लास व पिशव्या आढळल्याने त्यांना महापालिकेच्या शासकीय नियमानुसार दहा हजार रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे.

  • तसेच शहराचे विद्रुपीकरण करण्याबाबत रजक अकॅडमी या नावाने विना परवाना प्लेक्स बॅनर डांगे चौक, वाकड रोड येथे लावल्याने त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचे दंड वसूल केला. एका दुकानदाराला कच-याबाबत 500 रुपयांचा दंड केला, असे एकूण मिळून पंधरा हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

ही कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरिक्षक आर.एन. बेद, आरोग्य निरिक्षक एस. बी.चन्नाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3