Thergaon : रोटरी क्लबच्या मदतीने पालटले शाळेचे रुपडे

The school was transformed with the help of the Rotary Club

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या  संयुक्त विद्यमाने थेरगावातील प्रेरणा हायस्कूलचे   नूतनीकरण करण्यात आले आहे. या शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी केली आहे. यामुळे शाळेचे रुपडे पालटले आहे.

थेरगाव येथे प्रेरणा हायस्कूल आहे. शाळेची इमारत जुनी झाली होती. रंग उडाला होता. खिडक्या मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांनी संयुक्तपणे शाळेचे रुप पालटण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार शाळेच्या भिंतीना प्लास्टर केले. पूर्ण शाळेला रंगरंगोटी केली. त्यामुळे शाळा उठून दिसायला लागली. सध्या या  शाळेचे रुपडे पालटले आहे.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळकृष्ण उ-हे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे  अध्यक्ष जिग्नेश अग्रवाल, सचिव सारंग मताडे, संचालक संतोष जाधव, आनंद सूर्यवंशी,  रविंद्र भावे, शाळेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, सचिव कांतिलाल गुजर, प्राचार्य, व्यवस्थापन समिती सदस्य,  शिक्षक व कर्मचारी शाळेच्या उदघाटन प्रसंगी  उपस्थित होते.

अध्यक्ष बाळकृष्ण उ-हे म्हणाले, ”शाळेची रंगरंगोटी, नुतनीकरण केल्याने इमारत उजळली आहे. कोरोनामुळे शाळा सुरु झाल्या नाहीत. परंतु, शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसताना आनंद होईल.

शाळेची इमारत, परिसर चांगला असेल. तर, वातावरण प्रसन्न राहते. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष लागते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.