Thergaon : दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या मांजराची थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या तरुणांनी केली सुटका

एमपीसी न्यूज – इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर अडकलेल्या मांजराची थेरगाव सोशल फाऊंडेशन आणि वाईल्ड फॉर नेचरच्या तरुणांनी सुखरूप सुटका केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षर रेसिडेन्सी गुजरनगर, थेरगाव येथे गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून एक मांजर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावर अडकले होते. स्थानिक रहिवासी मुक्तेश मराठे यांनी मांजराला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी याबाबत थेरगाव सोशल फाऊंडेशनशी संपर्क केला. सदस्य विष्णू तरंगे यांनी पाईपच्या साहाय्याने मांजराला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना अपयश आले. रात्री वाईल्ड फॉर नेचरचे शुभम पांडे यांनी तिसऱ्या मजल्यावरून दोरीचा सापळा खाली सोडला. त्याद्वारे मांजराला वरती घेण्यात आले. काही तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.