Thergaon: घरासमोर बॅडमिंटन खेळणार्‍या तरुणीला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – घरासमोर बॅडमिंटन खेळणार्‍या तरुणीला ‘तू घरात जा, नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल’ असे म्हणत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पाच जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी होनाजी किसन घोगरे (वय 46), जनाबाई होनाजी घोगरे (वय 36), प्रथमेश होनाजी घोगरे (वय18), आरती कानिफनाथ घोगरे (वय 44), कानिफनाथ घोगरे (सर्व रा. समर्थ कॉलनी, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी थेरगाव येथील समर्थ कॉलनीत वास्तव्यास आहेत. फिर्यादी गुरूवारी रात्री साडेआठ वाजता घराबाहेर बॅडमिंटन खेळत होती. त्यावेळी आरोपी होनाजी घोगरे याने तिला ‘तू घरात जा नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल’, अशी धमकी दिली.

फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर इतर आरोपींनी तिला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिचा विनयभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.