Thergaon: थेरगावमधील रुग्णालयात कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरु करावेत -राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वैद्यकिय सुविधांचा विचार करुन या ठिकाणी तत्काळ कॅन्सर रुग्णालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. यामुळे शहरातील कॅन्सरच्या रुग्णांवर ईथेच उपचार होतील, असेही ते म्हणाले.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात गटनेते कलाटे यांनी म्हटले आहे की, जगासह आपल्या देशावर कोरोनाचे संकट आहे. या संकटाच्या काळात आपल्या शहरात कॅन्सरवर उपचारासाठी रुग्णालय असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

शहरातील एकंदरित वैद्यकिय सुविधांचा विचार करावा. त्यासाठी या ठिकाणी कॅन्सर रुग्णालय सुरु करावे. कॅन्सरसाठी गेली अनेक वर्ष योगदान देणा-या टाटा सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी सारख्या संस्थेमार्फत चालविण्यास द्यावे. त्यामुळे ख-या अर्थाने आपल्या सेवेचा उद्देश सार्थ होईल.

त्यासाठी तत्काळ थेरगावातील रुग्णालयात कॅन्सरवरील उपचार सुरु करावेत. जेणेकरुन शहरातील सर्व गरजू नागरिकांना रुग्णालय जीवन संजीवनी ठरु शकले, असेही कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.