Thergaon: सेक्स रॅकेट प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक

Thergaon: Two foreign women arrested in sex racket case व्हॅाट्सअ‍ॅपद्वारे लोकांशी संपर्क साधून थेरगाव येथील भाड्याच्या राहत्या फ्लॅटवर बोलवून त्या वेश्या व्यवसाय करीत असत.

एमपीसी न्यूज – व्हॅाट्सअ‍ॅपद्वारे लोकांशी संपर्क साधून थेरगाव येथील भाड्याच्या राहत्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या युगांडाच्या दोन महिलांना पोलीसांनी अटक केली आहे. 

थेरगावच्या पडवळनगर भागात एका सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असलेल्या मूळच्या युगांडाच्या नागरिक असलेल्या 25 वर्षे व 40 वर्षे वयाच्या दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना अतुल देवतळे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या मुळच्या  युगांडा येथील रहिवासी असून त्या थेरगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होत्या. तसेच त्यांचा भारतातील वास्तव्याचा व्हिसा संपलेला असतानाही त्या भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या. उपजीवीका चालवण्यासाठी त्यांनी राहत्या खोलीत वेश्याव्यवसाय सुरू केला. व्हॅाट्सअ‍ॅपद्वारे त्या लोकांना बोलवायच्या व वेश्याव्यवसाय करून कमाई करीत असत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.