Thergaon : ‘व्हेरॉक कप’ या उन्हाळी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

एमपीसी न्यूज – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी (Thergaon) आयोजित 12 वर्षाखालील मुलांच्या ‘व्हेरॉक कप’ उन्हाळी क्रिकेट स्पर्धेला थेरगाव येथील मैदानावर सुरुवात झाली. स्पर्धेचे उदघाटन माजी रणजीपटू, सीमाशुल्क अधीक्षक आणि 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक अतुल गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख, चंदन गंगावणे, भूषण सुर्यवंशी, प्रमोद लिमण, राहुल वेंगसरकर, डॉ. विजय पाटील उपस्थित होते. 

स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथील अकॅडमीच्या मैदानावर होणार आहेत. पहिल्या दिवशी चार साखळी सामने झाले. पहिला सामना पेस अॅथलेटिक्स क्रिकेट अकॅडमी (पराभूत) विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘अ’ झाला. त्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘अ’चा श्रवण राठोड हा सामनावीर ठरला. दुसरा सामना सहारा क्रिकेट अकॅडमी (पराभूत) विरुद्ध
व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी ‘ब’ असा झाला. त्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘ब’चा अर्जुन डोंगरे सामनावीर ठरला.

Pune : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न

तिसरा साखळी सामना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘अ’ (विजयी) विरुद्ध एच के बाऊन्स अकॅडमी (Thergaon) असा झाला. त्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी ‘अ’चा साईश बारटक्के सामनावीर झाला. चौथा सामना स्पार्क स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी (विजयी) विरुद्ध रायझिंग स्टार क्रिकेट अकॅडमी झाला. या सामन्यात स्पार्क स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचा सर्वेश रासकर सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.