Thergaon : पीएमपी बस प्रवासात महिलेचा लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – पीएमपी बसने प्रवास (Thergaon) करत असताना महिलेचा लॅपटॉप आणि इतर साहित्य अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी मनपा ते थेरगाव या मार्गावर घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञाताच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मनपा येथून लक्ष्मणनगर थेरगाव येथे जाण्यासाठी निघाल्या. त्या सकाळी सव्वा अकरा वाजता लक्ष्मणनगर, थेरगाव येथे पोहोचल्या. बसमधून उतरताना त्यांचा (Thergaon) लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

Jaipur : करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या

बसमधून प्रवास करताना अज्ञात चोरट्याने महिलेचा लॅपटॉप, चार्जर, माउस, एअरटेल कंपनीचे डेटाकार्ड असा एकूण 45 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.