Thergaon : तरुणाच्या तत्परतेने आगीमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असताना तरुणाने तत्परता दाखवत आसपासच्या नागरिकांची मदत घेऊन 28 कुटुंबातील शंभरहून अधिक नागरिकांना बाहेर काढले. ऋषिकेश काशिद असे या तरुणाचे नाव असून त्याने दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

सोमवारी (दि.१०) रात्री दहाच्या सुमारास थेरगाव येथील पाषणकर चाळीमध्ये अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती देवूनही त्याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. यानंतर ऋषिकेश यांनी तात्काळ अग्निशामक दल व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती दिली. तसेच आजूबाजूच्या नागरिकांची मदत घेत चाळीत राहणाऱ्या 28 कुटुंबातील शंभरहून अधिक नागरिकांना घराबाहेर काढले. शिवाय घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून पुढील संभाव्य हानी टाळली.

पोलीस व अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दीड तास परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान दीड तासानंतर पोहोचलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाह बंद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.