Thergaon: शिवीगाळ करताना हाटकले म्हणून तरुणाला हातोडा व स्क्रूड्रायव्हरने मारहाण

एमपीसी न्यूज –  शिवीगाळ करताना हाटकले म्हणून (Thergaon)तरुणाला हाताडीने व स्क्रू ड्रायव्हरने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१९) दत्तनगर, थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी आनंद तुकाराम चव्हाण (वय ३२ रा.थेरगाव)  यांनी (Thergaon)वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राहूल शेऊ पवार (वय ३३ रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या गाडीचे पंक्चर काडण्यासाठी टायर्सच्या दुकानात गेले होते. यावेळी आरपी देखील त्याचा छोटा टॅम्पो घेऊन आला. यावेळी त्याने तेथील कामगाराला हवा बघ म्हणत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांनी शिवीगाळ का करतोस असे विचारले असता याचा राग येवून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत पंक्चरच्या दुकानातील हातोड्याने  व स्क्रू ड्रायव्रने मारहाण करत जखमी केले. तसेच फिर्यादीने त्याला ही मारहाण केली. यामध्ये  फिर्यादी यांची बहिणी तिथे आली असता आरोपीने सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.