Talegaon Dabhade: तळेगावमध्ये नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग, होमिओपॅथिक गोळ्यांचेही वाटप

Thermal scanning of citizens in Talegaon, also distribution of homeopathic tablets

एमपीसी न्यूज- कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व नगरसेवक संतोष भेगडे यांच्यावतीने वॉर्ड क्रमांक 11 व 12 मधील नागरिकांचे थर्मल स्कॅन चेकअप व होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून हा उपक्रम तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक संतोष भेगडे यांच्यावतीने राबविण्यात आला.

आठ हजार नागरिकांना होमिओपॅथीक गोळ्या व पाच हजार नागरिकांचे थर्मल स्कॅन चेकअप करण्यात आले. त्याचबरोबर 3500 सॅनिटायझरच्या बॉटल वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मोठ्यासंख्येने नागरिक उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या आयुष विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक मेडिसीन इम्युनिटी बुस्टर म्हणून सुचविले त्या अनुषंगाने नगरसेवक संतोष भेगडे यांनी ‘अर्सेनिक अल्बम 30’ या गोळ्या मोफत वाटल्या.

या उपक्रमांतर्गत नगरसेवक संतोष भेगडे परिवाराच्या वतीने आठ हजार व्यक्तीना मोफत होमिओपॅथीक गोळया वाटप करण्यात आल्या असून पाच हजार नागरिकांचे मोफत थर्मल स्कॅन चेकअप करण्यात आले आहे.

उर्वरित नागरिकांसाठी यापुढे गोळ्यांचे वाटप व थर्मल स्कॅन चेकअप करण्याचे काम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.