Theur : राइज अँड शाइन कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज – थेऊर येथील राइज अँड शाइन बायोटेक कंपनीला आज (दि. 14) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे अग्निशमन दलाचे तीन आणि पीएमआरडीएचे तीन टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग नियंत्रणाचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या आगीत कंपनीचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे तसेच या आगीने परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.