Theur : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – थेऊर परिसरात घरावर दरोडा टाकण्याचा (Theur) प्रयत्न चौघांना पोलिसांनी पकडले असून चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अंधारात चोरट्यांचे साथीदार पसार झाले असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

अक्षय उर्फ आकाश उर्फ ओंकार धनाजी सोनवणे (वय 20), प्रसाद धनाजी सोनवणे (वय 19), आदित्य गणेश सावंत (वय 20), पारस श्रीकांत कांबळे (वय 25, सर्व रा. थेऊर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलीस नाईक विशाल बनकर यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Kondhwa : खुनाच्या तयारीत असलेल्या सराईताला शस्त्रासह अटक

सोनवणे आणि साथीदार थेऊर गावात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची (Theur) माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सोनवणे, सावंत, कांबळे यांना पकडले. अंधारात चोरट्यांचे चार साथीदार पसार झाले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.