Dehuroad News : लेफ्टनंट कर्नलच्या घरातून पैशांची चोरी करणारा चोर अटकेत

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील स्वतंत्र वायू रक्षा ब्रिगेड मध्ये कार्यरत असलेल्या लेफ्टनंट कर्नलच्या घरातून एका चोरट्याने 500 रुपये चोरून नेले. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल आणि आर्मीच्या स्टाफने चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) रात्री अशोकनगर, चिंचोली येथे घडला.

प्रशांत तुकाराम जानराव (वय 39, रा. कासारसाई, ता. मावळ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. भगवान नंदराम यादव (वय 49, रा. अशोकनगर, चिंचोली) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 14) फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वतंत्र वायू रक्षा ब्रिगेड, देहूरोड येथे लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी प्रशांत याने फिर्यादी यांच्या बंगल्याच्या बंद गेट मधून उडी मारून आत प्रवेश केला. बंगल्यातील हॉलमध्ये टेबलवर ठेवलेल्या पाकिटातून 500 रुपये चोरून चोरट्याने धूम ठोकली.

चोरटा आयप्पा मंदिराच्या दिशेने गेला असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यांनतर फिर्यादी लेफ्टनंट कर्नल आणि त्यांच्या स्टाफने परिसरात शोघ घेऊन आरोपीला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.