Chakan : साबळेवाडी येथील अंबिकामाता मंदिराच्या दान पेटीतून रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे अंबिका माता मंदिराच्या गाभा-याबाहेर ठेवलेल्या दान पेटीतून दोन अनोळखी चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) मध्यरात्री घडली.

संतोष मल्हारी शेटे (वय 46, रा. साबळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळेवाडी येथे अंबिका माता मंदिर आहे. बुधवारी मध्यरात्री दोन ते पावणे तीन वाजताच्या कालावधीत दोन अनोळखी चोरटे मंदिरात आले. मंदिराच्या गाभा-याच्या समोर ठेवलेल्या दान पेटीचे कुलूप तोडून दान पेटीतून सुमारे पाच ते सहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.