Pune News : चोरट्यांनी बिअर शॉपी फोडली, पण एकाही बिअरला हात लावला नाही

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुण्याच्या खडकवासला परिसरातील एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकाने फोडली. यातील दुकानांमध्ये एका बिअर शॉपीचाही समावेश आहे. चोरट्यांनी शटर उचकटून बिअर शॉपी मध्ये प्रवेश केला आणि गल्यात असणारे किरकोळ आठशे ते हजार रुपयाची रक्कम चोरून नेली. मात्र यात चोरट्यांनी एकाही बियर ला हात लावला नाही. त्यामुळं पुढच्या या अनोख्या घटनेमुळे खडकवासला परिसरात एकच चर्चा रंगली आहे

अज्ञात चोरट्यांनी साई कार डेकोर, रुबाबदार क्लॉथ सेंटर आणि स्वागत बिअर शॉपी अशी तीन दुकाने एकाच रात्री फोडली. यातील साई कार डेकोर या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे तेथील चोरी या कॅमेऱ्यात कैद झाली. तोंड बांधलेल्या अवस्थेतील तीन चोरटे चोरी करताना दिसत आहेत. त्यानंतर यात चोरट्यांनी आपला मोर्चा स्वागत बिअर शॉपी कडे वळवला.

चोरट्यांनी स्वागत बिअर शॉपी च्या शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गल्ल्यात असणारे आठशे ते हजार रुपये चोरून नेले. मात्र या चोरट्यांनी एकाही बियरला हात लावला नाही. दरम्यान हे चोरटे रुबाबदार क्लॉथ सेंटरचे ग्रुप सोडून शटर उचलण्याचा प्रयत्नात असताना त्याचा आवाज झाला आणि वर राहणारे दुकानमालक जागे झाले आणि त्यांनी धाव घेतली. त्यांना पाहून चोरट्यांनी पळ काढला.

संबंधित व्यवसायिकांनी याची माहिती हवेली पोलिसांना दिली असून हवेली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.