Dehuroad News : विकासनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी पळवले अमेरिकन आणि सिंगापूर डॉलर

0

एमपीसी न्यूज – विकासनगर येथे एका घरात चोरी करून चोरट्यांनी अमेरिकन आणि सिंगापूरच्या चलनातील डॉलर, सोन्याचे दागिने, भारतीय चलनातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली.

सूर्यकांत वामन शिंदे (वय 64, रा. विकासनगर, किवळे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे घर मंगळवारी (दि. 16) रात्री आठ ते बुधवारी पहाटे साडेतीन या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच अमेरिकन आणि सिंगापूर येथील डॉलर असा एकूण एक लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

चोरट्यांनी चोरलेल्या अमेरिकन आणि सिंगापूरच्या डॉलरची भारतीय चलनातील किंमत सुमारे 30 हजार एवढी आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.