Pune crime news: खरेखुरे सोने लुटून चोरट्यांनी साजरा केला दसरा

एमपीसी न्यूज- एकीकडे पुणेकर भयमुक्त दसरा उत्साहात पार पाडत असतानाच शहरात गेल्या काही दिवसांपासून उचल खाल्लेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा दसरा “सोने लुटून” पार पडला आहे.

पुण्यात सोन साखळी चोरीचे 7 गुन्हे केले आहेत. शहरातील सिंहगड रोड, कोंढवा, दत्तवाडी, मार्केटयार्ड, हडपसर आणि वारजे व वानवडीत घटना घडल्या असून, गुरूवारी दिवसभर आणि शुक्रवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यामुळे पुण्यात फक्त चोरट्यांचीच भीती असल्याचे दिसून येत आहे. तर पोलीस पेट्रोलिंग आणि गस्त घालतात कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.