Bhosari News : चोरट्यांचा आता इंधनावर डोळा; रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रक मधून चोरले 70 लिटर डिझेल

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढ सुरूच असल्याने चोरट्यांनी आता वाहने चोरण्याऐवजी वाहनातून डिझेल चोरीकडे मोर्चा वळवला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरात रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ऐका ट्रकमधून चार चोरट्यांनी 70 लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे साडेपाच वाजता एमआयडीसी भोसरी मधील चिंटू ट्रान्सपोर्ट प्रा ली या ऑफिस समोर घडली.

राहुल वाघंबर शिंदे (वय 31, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी येथे चिंटू ट्रान्सपोर्ट प्रा ली या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत फिर्यादी मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीचा ट्रक गुरुवारी पहाटे कार्यालयाच्या समोर पार्क केला होता. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी ट्रकच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून टाकीतील सात हजार रुपयांचे 70 लिटर डिझेल काढून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.