Pune : चोरट्यांनी हिसका मारून हिरो शो-रूम मालकाची पळवली 2 लाखांची बॅग

एमपीसी न्यूज – हिरो शो-रूम मालकाची 2 लाखांची रोकड असलेली बॅग हिसका मारून चोरटयांनी चोरुन मोपेडवर पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.17) संध्याकाळी 7 च्या दरम्यान वाकडेवाडी येथील हिरो शो-रूम च्या समोरील रोडवर घडली.

याप्रकरणी किशोरीलाल चड्डा (वय 84, रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोरीलाल चड्डा यांचे वाकडेवाडी मध्ये हिरो कंपनीचे मोटारसायकलचे शो-रूम आहे. नेहमीप्रमाणे ते शो-रूम मध्ये जमा झालेली रक्कम व एचडीएफसी बॅंकेचे सह्या असलेले चेकबुक कापडी चैन असलेल्या बॅगमध्ये ठेवून ती घेऊन त्यांच्या कार ड्रायव्हरसह शो-रूम समोरील रोडवर असलेल्या कारजवळ आले. दरम्यान एक अनोळखी इसम तिथे आला आणि त्याने किशोरीलाल यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावली व पुढे मोपेडवर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदारासह मोपेडवर बसून पसार झाला.

याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.