Pune : शहर शिक्षक लोकशाही आघाडीची सह विचार सभा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विद्यालय सदाशिव पेठ पुणे येथे पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडीची सहविचार सभा पार पडली. याप्रसंगी 9 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्या जाणा-या उपक्रमशील शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श महिला शिक्षिका, शिक्षक पञकार मित्र पुरस्कार संदर्भात चर्चा तसेच पुरस्कार प्रस्ताव छाननी करण्यात आले.

तसेच आपले शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जी.के.थोरात सर यांच्या शहर शाळाभेट दौराविषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष धारूरकर सर, राज्य प्रतिनिधी प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, शहर लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे सर, कार्यवाह संतोष थोरात सर, महिला अध्यक्षा माधवी पांढरकर, तसेच सर्व विभाग अध्यक्ष गिरमे सर, दहिफळे सर, दोडके सर, आनंद भिकुले, योगेश शिंदे, रोहन कांबळे, स्वाती निम्हण, विलास शिंदे, ठवाळ सर, बिबीषन पवार, ढवळे सर तसेच शहरातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.