Talegaon : शब्दश्रीमंती काव्यमंचचे तृतीय मासिक कवी संमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज – कालेकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रविवारी (दि.24) तळेगाव दाभाडे स्टेशन येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडले.

सर्वप्रथम या कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रथम पाच उपस्थित कवींमधून ज्येष्ठ कवी वसंत जोशी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि यानंतर कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या शेक्सपिअर आला तुकोबांच्या भेटी या कविता वाचनाने कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर केल्या. यामध्ये कविश्रेष्ठ दत्तात्रय मेढ़ी, श्रीकृष्ण पुरंदरे, सुनंदा वाढोने, रामहरी घोळवे, श्रीराम घडे, संस्थेचे अध्यक्ष पुनम कालेकर वल्लभ कालेकर तसेच युवा कवी श्रद्धा ठोंबरे, निकिता कांबळे, नेहा व इतरांनी आपल्या कविता सादर केल्या.

काही कविंनी आपल्या कविता चाल बद्ध करून गीत स्वरूपात सादर केल्या आणि कवी संमेलनाची एक वेगळी उंची गाठली. अध्यक्ष वसंत जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शब्दश्रीमंती काव्य मंचाचे हे कवी संमेलन हा एक स्तूत्य उपक्रम आहे आणि यामुळे कित्येक ज्येष्ठ कवींना आणि त्याचबरोबर नवोदित कवींना सुद्धा तळेगाव दाभाड़े सारख्या सांकृतिक शहरात आपल्या कविता सादर करण्यासाठी एक मासिक व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही शब्द श्रीमंती जास्तीत जास्त कवींनी एकत्र येऊन वाढवावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता मेढी सर यांनी गायलेल्या प्रार्थनेने करण्यात आली. शब्द श्रीमंती काव्यमंचचे पुढील मासिक कविसंमेलन 22 डिसेंबर 2019 रविवार रोजी दुपारी चार वाजता येथे आयोजित करण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले. तरी सर्व इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा 9518972947 /7822862457

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.