BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi बांधकाम साईटवरून साडेसहा लाखांची वायर चोरीला

एमपीसी न्यूज – स्टोअर रूमचा पत्रा उचकटून बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 6 लाख 56 हजार 478 रुपयांची पॉलीकॅब वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 3) सकाळी दहाच्या सुमारास बावधन येथील आकाश पर्व बिल्डिंगमध्ये उघडकीस आली.

संजय बबन भोर (वय 44, रा. वारजे माळवाडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या शारदा प्रमोटर्स अँड बिल्डर्स या कंपनीची बावधन येथे आकाश पर्व नावाची नवीन साईट सुरु आहे. साईटवरील इलेक्ट्रिक फिटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वायर आणून स्टोअर रूममध्ये ठेवल्या होत्या. स्टोअर रूम कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी स्टोअर रूमच्या भिंतीचा पत्रा उचकटून स्टोअर रूममध्ये प्रवेश केला.

चोरट्यांनी स्टोअररूममधून 500 मीटर लांबीच्या एकूण 6 लाख 56 हजार 478 रुपये किमतीच्या पॉलीकॅब वायर चोरून नेल्या. बुधवारी सकाळी स्टोअर रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.