Dehu : गळा चिरून तरुणाची निर्घृण हत्या; तीनजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना देहू येथील भैरवनाथ मंदिरालगत काल शुक्रवारी (दि.12) रात्री अकराच्या सुमारास घडली.

गणेश बलभीम बनगर (वय.21.रूपीनगर हौसीग सोसा. दत्तमंदीर जवळ, रूपीनगर), असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण गणेश बनगर आणि अज्ञात हल्लेखोरांचे कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्राने गळ्यावर पोटावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. परंतु देहूरोड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुढील तपास देहू पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.